भुसावळात मोताळा जिल्ह्यातील युवक शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : मृताजवळ आढळली विषारी कीटकनाशकाची बाटली


भुसावळ : शहरातील कन्हाळा रोड भागात युवकाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोर आली. याबाबत बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक कृष्णा जाधव (28, रा.चावडदा पिंप्री, ता. मोताळा) असे मयताचे नाव आहे. दीपक जाधव या युवकाने येथील कन्हाळा रोडवरील घोडेपीर बाबा दरगाह जवळ बाभळीच्या झाडाखाली विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली मात्र आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

तालुका पोलिसात होती नोंद
दीपक जाधव हरवल्याबाबत तालुका पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, 17 रोजी घोडेपीर बाबा दरगाह जवळ त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळून आल्याने दीपकच्या मृत्यूविषयी साशंकता होती मात्र घटनास्थळी, मद्याची व पाण्याची बाटली, विषारी औषधाची बाटली पोलिसांना आढळली आहे. तसेच मृृत व्यक्तीच्या जवळ मॅस्ट्रो कंपनीची पांढरी दुचाकी (एमएच 19 बीव्ही 3099) पोलिसांनी तेथून जप्त केली आहे. त्यावर पुढच्या बाजुला अशोक चक्र व मागील बाजूला डिफेन्स असे लिहिलेले आहे.



आत्महत्येचे कारण अस्पष्ट
याबाबत संदीप उत्तम सुरवाडे (रा.शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) यांच्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश मुर्‍हे करत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !