जळगावात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : दोघे आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
गावठी कट्टा जप्त : अटकेतील आरोपी मध्यप्रदेशातील बर्हाणपूरचे रहिवासी
In Jalgaon, there was terror in the village of Kattya: Two accused in the net of MIDC police जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या मध्यप्रदेशातील दोघांच्या मुसक्या शनिवारी सायंकाळी आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अक्षय प्रकाश घारू (21), नितीन देविदयाल सालवे (25, दोघे रा. फुकटपुरा, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे काही संशयीत गावठी कट्टा फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे नाईक विकास सातदिवे यांना मिळताच त्यांनी निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती कळवल्यानंतर गुन्हे शोध पथकाने आरोपींच्या शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसक्या बांधल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार व अपर पोलिस अधीक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या अमार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार सचिन मुंडे, रामकृष्ण पाटील, विकास सातदिवे, किशोर पाल, योगेश बारी, गणेश शिरसाळे, किरण पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.