तिकीटाबाबत विचारणा करणार्या महिला कंडक्टरला अश्लील शिविगाळ
Inquiring about the ticket, the female conductor was abused अमळनेर : टिकीट का काढले नाही? अशी विचारणा केल्याच्या रागातून बस कंडक्टरला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी एकाविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नोकरी हिरावण्याची दिली धमकी
शनिवार, 17 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला बस कंडक्टर आपल्या कर्तव्यावर असताना संशयीत राजेंद्र भगवान पाटील (रा.निम, ता.अमळनेर) हे निम येथून बसमध्ये बसले. परंतू त्यांनी कळमसरे गावापर्यंत टिकीट काढले नाही त्यामुळे महिला बस कंडक्टरने याबाबत राजेंद्र पाटील यांना जाब विचारला. याचा राग आल्याने त्यांनी महिला बस कंडक्टरला अश्लिल शिवीगाळ करीत करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच नोकरी खाण्याची धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील तेली करीत आहेत.

