भुसावळातील प्रभाग सातमध्ये ‘रस्त्यांनी टाकली कात’
माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी शब्द केला खरा : काँक्रिटीकरणाला सुरूवात
In Ward Seven of Bhusawal, ‘Roads have been thrown away’ भुसावळ : शहरातील प्रभाग सातचे माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी नागरीकांना प्रभागात विविधांगी सोयी-सुविधांसह दर्जेदार रस्ते निर्मितीचे आश्वासन दिले होते व प्रत्येक आश्वासनपूर्तीच्या दृष्टीने त्यांची जोरदार वाटचाल सुरू आहे. प्रभाग सातमधील जुना सातारा राममंदिर ते विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार संजय सावकारेंच्या हस्ते करण्यात आला. मुकेश पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यातून या रस्त्याचे काम होत असल्याने प्रभागातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
स्थानिक आमदार निधी अंतर्गत पालिकेच्या प्रभाग सातमधील जुना सातारा भागातील राम मंदिर ते विठ्ठल मंदिर आणि हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा नुकताच आमदार सावकारे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, किरण कोलते, देवा वाणी, परीक्षीत बर्हाटे, महेंद्र ठाकूर, अजय नागराणी, गिरीश महाजन, निक्की बत्रा, राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, सतीश सपकाळे, प्रतिभा पाटील, किशोर पाटील, गुणवंत बोरोले, वसंत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार सावकारे यांचे स्वागत मुकेश पाटील, सतीश सपकाळे, अनिता सपकाळे यांनी केले. आमदार सावकारे यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करून नारळ वाढवून कामास शुभारंभ केला.

दर्जेदार काम होणार : आमदार
आमदार सावकारे म्हणाले की, आमदार निधी अंतर्गत या रस्त्याचे काम केले जात असून उत्कृष्ट पद्धतीचे काम असेल, नागरीकांना कुठल्याही तक्रारी करण्यास संधी मिळणार नाही. गेल्या अनेक वर्षानंतर या परीसरात रस्त्याचे काम होत आहे. नागरीकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक आमदार निधीमधून शहरात विविध भागांमध्ये विकासकामे केली जात आहे.
प्रभागाच्या विकासासाठी कटीबद्ध : मुकेश पाटील
निवडणुकीपूर्वी प्रभागात विविधांगी सोयी-सुविधा व विकासकामे करण्याचा शब्द दिला होता व प्रत्येक आश्वासनांची पूर्ती आपण करीत आलो आहोत व यापुढेदेखील प्रभागाचा चौफेर विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे माजी नगरसेवक मुकेश पाटील म्हणाले. नागरीकांचा विश्वास आपण सार्थ ठरवत असून यापुढेदेखील प्रभागात विकासकामांची घौडदौड कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.