बकर्या चारण्यास मनाई केल्याचा राग : केळी झाडे कापल्याने सव्वा लाखांचे नुकसान
Anger over ban on grazing goats: Loss of half a million due to cutting of banana trees यावल : बकर्या चालण्यास मनाई केल्याचे कारणावरून यावल येथील केळी उत्पादक शेतकर्याच्या शेतातील केळी झाडे कापून दोन संशयीतांना सव्वा लाखांचे नुकसान केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असुन या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात केळीचे झाडे कापून नुकसान झाले व आता यावलमध्ये त्या घटनेची पुर्नावृत्ती झाल्याने शेतकर्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकरी झाले संतप्त
यावल शहरातील शेतकरी निर्मल नथ्थु चोपडे यांचे यावल शिवारातील शेत गट नंबर 808 आहे यात त्यांनी केळी लागवड केली आहे व बर्या पैकी तिची वाढ झाली आहे.सद्या आठ महिन्याचे सदर केळी पिक झाले असुन त्यांच्या या शेतालगत अट्रावल गावातील बकर्या चारणारे येतात दरम्यान दोन दिवसांपुर्वी सायंकाळी अट्रावल येथील सागर मानेकर व नामदेव कोळी हे दोघे शेतातून बकर्या नेत असतांना त्यांना शेतकरी निर्मल चोपडे यांनी शेतात बकर्या चारण्यास मनाई केली होती. या दोघांनी चोपडे यांना धमकी दिली होती की, आता तु केळीचा हंगाम कसा घेतो हे पाहू. दरम्यान शुक्रवारी चोपडे यांचा सालदार मिलिंद नेमाडे हा शेतात गेला असता त्यांला केळी पिकाचे झाडे कापून फेकल्याचे निर्दशनास आले व त्यांनी शेतकरी निर्मल चोपडे यांना माहिती दिली.


दोघांनी धमकी केली खरी
शेतकर्याने शेतात जावून पाहिले असता सुमारे दीडशे केळीचे झाडे कापून टाकल्याचे दिसून आले. ही झाडे धमकी दिल्यानुसार सागर मानेकर व नामदेव कोळी (अट्रावल) यांनी कापल्याचा संशय व्यक्त करीत यावल पोलिस दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेण पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेता तातडीने दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे
शेतकर्यामधुन संताप
गेल्या दोन दिवसांपुर्वी रावेर तालुक्यात अशाचं प्रकारे केळीचे झाड कापून नुकसान करण्यात आले व आता यावल शिवारात त्यांची पुर्नावृत्ती झाल्याने शेतकरी वर्गातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
