हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा दिड लाखांचा ऐवज लांबवला


The compensation of the passenger from Humsafar Express was delayed for half a lakh भुसावळ ; रेल्वेतील वाढत्या चोर्‍यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सातत्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.

दिड लाखांचा ऐवज असलेली बॅग लांबवली
हमसफर एक्स्प्रेसद्वारे प्रवास करणारे अलीन भारती चितरंजन लाल भारती (रा. प्याराडाइज अपार्टमेंट, कदजम, बिहार) यांची लॅपटॉपसह आयपॅड व अन्य वस्तू असलेली बॅग बी-5 या डब्यातील 63 नंबरच्या सीटवरून चोरट्यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रवासी झोपल्याची संधी साधून लांबवली. एक लाख 46 हजार रूपयांचा ऐवज चोरी प्रकरणी इटारसी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याची कागदपत्रे भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर हद्द नंदुरबार लोहमार्ग असल्याने हा गुन्हा पुन्हा नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.


कॉपी करू नका.