भागलपूर एक्स्प्रेसमधून सहा हजारांची रोकड असलेले पाकिट लांबवले


Bag containing cash of 6000 was handed over from Bhagalpur Express भुसावळ : अप भागलपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाचे सहा हजारांची रोकड असलेले पाकिट चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाढत्या चोर्‍यांनी प्रवासी त्रस्त
संजू गुप्ता श्रावणकुमारदास (30, बुदविमा, सरकडा, जि.यादवगंज, झारखंड) हे 22948 अप भागलपूर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ए- 2 च्या बर्थ क्रमांक चारवरून भागलपूर-सुरत असा प्रवास करीत असताना चोरट्यांनी प्रवासी झोपल्याची संधी साधून सहा हजारांची रोकड असलेले पाकिट लांबवले. 17 रोजी रात्री दोन वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी 139 वर तक्रार नोंदवल्याने भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जबलपूर येथे वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !