सुरक्षा रक्षकाचा पेटता मृतदेह जळगावातील बंद कंपनीत आढळला
The burning body of a security guard was found in a closed company in Jalgaon जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या बंद असलेल्या कंपनीत गुरुवारी सकाळी 66 वर्षीय सुरक्षारक्षकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ईश्वर देवराम अहिरे (66, रा.रामनगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूने खळबळ
राम नगरात ईश्वर देवराम अहिरे (66) हे परीवारासह वास्तव्यास होते व ते एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील विक्रम प्लास्टिक ही बंद पडलेली कंपनी आहे. या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक काशीनाथ मराठे हे आल्यानंतर त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसताच त्यांनी खातरजमा केल्यानंतर त्यांना एक व्यक्ती जळत असल्याचे दिसून आले. त्यानंतर मराठे यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे व कर्मचार्यांनी धाव घेतली. या प्रकरणी शुभम लालसिंग ठाकूर (30) यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली.

घातपात नाही : शेकोटीत पडल्याने मृत्यू
ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा देखील काही महिन्यांपूर्वी जळून मृत्यू झाला असून तसेच चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या एका नातवाने देखील आत्महत्या केली होती. अहिरे यांना दारूचे व्यसन होते तसेच तीन दिवसापूर्वी त्यांचा पगार झाल्यानंतर ते कामावर आले नव्हते. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे म्णाले की, अहिरे यांना दारू पिण्याचे व्यसन होते व रात्री थंडी असल्याने त्यांनी शेकोटी केली व त्यात तोल गेल्यानेच त्यांचा मृत्यू ओढवला, असे त्यांनी सांगितले.

