ड्रामा क्वीन राखी सावंत या कारणास्तव पोलिसांनी केली अटक


Rakhi Sawant was arrested by Amboli police मुंबई : या ना त्या कारणाने चर्चेच्या वलयात राहणार्‍या ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. मॉडेलचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोळी पोलिसांनी राखी सावंतला अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी केली कारवाई
शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राखी सावंतने पत्रकार परीषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि असभ्य भाषा वापरली होती.


कॉपी करू नका.