शालेय जीवनात मिळालेली ज्ञान व संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरणारी

दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन


भुसावळ : ज्ञान आणि संस्काराशिवाय जीवन शून्य आहे. संस्कार व ज्ञानच मनुष्याला श्रेष्ठ बनवते. कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्याच्यावर झालेल्या संस्कारावर आणि त्यांनी मिळविलेल्या ज्ञानावर अवलंबून असते. समाजहित तसेच देशहित सांभाळण्यासाठी संस्काराची शिदोरी प्रत्येकाने जोपासली पाहिजे त्यामुळे शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी असून ती सोबत ठेवण्याचे आवाहन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी ऐनपूर, ता.रावेर येथे केले. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्था संचालक तथा बलवाडी शाळेचे मुख्याध्यापक एन.व्ही. पाटील होते. प्राचार्य आर.जे.पाटील, उपमुख्याध्यापक एस.डी.चौधरी, पर्यवेक्षक पी.आर.महाजन, प्रा.जी.यू. कंखरे, प्रा.जे.डी.महंत, स्थानिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जी.आर.महाजन, वरीष्ठ शिक्षक डी.बी.चौधरी यांची व्यासपीठावर होती. दहावीच्या मैत्रेयी प्रफुल्ल जोशी, मोहित सुधीर महाजन, यश मनोहर कोळी, अर्पित सुशील चौधरी तर बारावीच्या तेजस्विनी राजेंद्र चौधरी, भूमिका सुनील भिरूड, वैष्णवी पांडुरंग पाटी, प्रेम गोपाल महाजन, सैय्यद आवेश सय्यद कलीम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.जगदीश पाटील यांचा परीचय वाय.आर.महाजन यांनी करून दिला. सूत्रसंचालन वाय.आर महाजन यांनी तर आभार आर.बी.पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !