भुसावळ शहरातील अल्पवयीन तरुणीला पळवले
A minor girl was abducted from Bhusawal city भुसावळ : शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
45 वर्षीय पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून गुरुवारी दोन वाजता घरातून दुपारी पळवून नेले. सर्वत्र शोध घेवूनही तरुणीचा तपास न लागल्याने शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.








