शालांत परीक्षा मंडळाच्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकांची परंपरा कायम ! : प्र. ह.दलाल यांचा आरोप
In schools, the tradition of mistakes in the question paper of the 12th Marathi subject of the examination board continues! : Q. Allegation of H. Dalal भुसावळ : बारावी परीक्षेला नुकतीच सुरूवात झाली असून गुरुवारी झालेल्या पहिल्याच मराठी विषयात प्रश्नपत्रिकेत चुकांची परंपरा यंदादेखील बोर्डाने कायम राखली असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे.
चुकांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप
पहिल्याच पानावर विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना क्र.2 मध्ये लेखांनियमनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे असे विद्यार्थ्यांना सांगताना हेच वाक्य मात्र बोर्डानेच प्रचलित लेखन नियमानुसार लिहिलेले नाही हा एक विनोदच म्हणावा लागेल. राज्य शासनाने 9 नोव्हेबर 2009 व 10 नोव्हेबर 2022 च्या आदेशानुसार गाठ युक्त ( श) न लिहिता देठ युक्त लिहावा व ल असा न लिहिता पाकळी युक्त लिहावा आणि जोडाक्षर पारंपरीक पद्धतीनेच लिहावे तोडून लिहू नये, असे स्पष्ट म्हटले आहे. उदा. पद धत, दवन दव , दिग् गु, असे न लिहिता पद्धत, द्वंद्व, द्विगु, असे लिहावे असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे मात्र बोर्डाने ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे द हे व्यंजन जोडाक्षरे आधी आल्यास व त्यापुढे य आल्यास द्य असे लिहावे उदा. विद्या, उद्या.असा नियम असताना ह्या कृतीपत्रिकेत (प्रश्नपत्रिका) मात्र त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सर्वत्र गदय, पद् य, दयावें, वैद य असे चुकीच्या पद्धतीने लेखन केलेले आहे. विद्यार्थ्यांना मात्र लेखांनियमाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सांगितले आहे.

हा तर बेजवाबदारपणा
विभाग 2 कृती 2 अ यातील ( य) मध्ये , ‘गोंडणार्या हिरव्या नक्षी प्रमाणे शेत पिकाने सजवते ’ या वाक्यात पीक असे न लिहिता पिक लिहिल्याने वाक्याचा अर्थच शेत कोकिळने सजवते असा झाला आहे (पिक – कोकीळ) तज्ज्ञांच्या ह्या बेजबाबदारपणाला काय म्हणावे? विभाग 5 प्रश्न 5 (आ) निबंध लिहा. पाच विषय दिलेले आहेत मात्र एकही वाक्याच्या शेवटी कोणतेच विरामचिन्ह दिलेले नाही ही सुद्धा गंभीर चूकच आहे. विरामचिन्हे असायलाच हवेत.उदा. मी फळा बोलतोय ! एकंदरीत बोर्डाने लेखन नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांकडून मात्र नियमा नुसार लेखनाची अपेक्षा केली असल्याचे प्र.ह.दलाल यांनी कळवले आहे.
