गीतांजली एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लांबवला : जळगावातील घटना


Passenger’s mobile stolen from Gitanjali Express: Incident in Jalgaon भुसावळ : 12860 गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये चढताना प्रवासी लोटन गुलाब पिंजारी (46, भिलाली, ता.पारोळा) यांचा अज्ञात चोरट्यांनी 19 हजार 400 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला.

लोहमार्ग पोलिसात गुन्हा
जळगाव रेल्वे स्थानक सुटल्यानंतर ही घटना 15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात प्रवाशाच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक नरेंद्र चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !