पुष्पक एक्स्प्रेसमध्ये जळगावच्या तरुणीचा विनयभंग
Jalgaon girl molested in Pushpak Express भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये जळगाव येथील तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जळगावातील तरुणाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावातील तरुणाविरोधात गुन्हा
जळगावातील 55 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, 11 फेबु्रवारी रोजी दुपारीतीन वाजता त्यांच्या मुलासह परीचीतातील तरुण भुसावळून नागपूर असे पुष्पक एक्स्प्रेसने निघाले असता प्लॅटफार्म क्रमांक पाचवर गाडी उभी असताना संशयित पियुष विष्णू शर्मा (28, रा.मोहाडी रोड, जळगाव) याने घरगुती वादातून हुज्जत घातली तसेच तरुणीला अश्लिल शिविगाळ करीत तिचा विनयभंग केला तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओशुटींगही केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यानंतर 1 मार्च रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरिक्षक संजय साळुुंखे करीत आहेत.

