भरधाव चारचाकीने उडवल्याने पाचोरा शहरातील तरुणाचा मृत्यू


Pachora city youth dies after being run over by a speeding four-wheeler पाचोरा : पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील 21 वर्षीय युवकाचा अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवार., 8 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नवीन गोपालदास वासवानी (21) असे मयत युवकाचे नाव आहे.

अज्ञात चारचाकीने उडवले
पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी नवीन गोपालदास वासवानी (21) हा युवक बुधवार, 8 मार्च रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घरासमोरुन जात असतांना एका अज्ञात चारचाकीने नवीन वासवानी यास जोरदार धडक दिल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत त्यास त्याचे नातेवाईक सेवकराम अर्जुनदास वासवानी यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच सिंधी कॉलनी परीसरात शोककळा पसरली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, गुरुवार, 9 मार्च रोजी सकाळी शहरातील सिंधी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !