नशिराबादच्या प्रौढाचा शेतातील विहिरीत आढळला मृतदेह


Dead body of Nashirabad adult found in field well जळगाव : नशिराबाद गावातील प्रौढाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला असून नेमक्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी बुधवारी नशिराबाद पोलसात अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली. प्रमोद प्रल्हाद माळी (45, वरची आळी, नशिराबाद) असे मयताचेे नाव आहे.

मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील भिलवाडा येथील सुनील श्रावण मोरे हे त्यांच्या शेतातील विहिरीजवळ बुधवारी दुपारी पाणी घेण्यासाठी आले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळल्याने त्यांनी लागलीच गावातील नागरीकांना बोलावून घटनेची माहिती दिली. नागरीकांनी मयत हा नशिराबाद येथील प्रमोद प्रल्हाद माळी (45) असल्याची ओळख पटवली. त्यानंतर नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढत पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान, मयत प्रमोद माळी हे मंगळवारी घरात कुणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्याची माहिती आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !