साळिंदराची शिकार : संशयित आरोपींना 10 मार्चपर्यंत वनकोठडी
Salindara hunt : Suspected accused remanded till March 10 मुक्ताईनगर : तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारात साळिंदरची शिकार करून त्याचे मास शिजवताना चौघांना अटक करण्यात आली होती. संशयीताना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 10 मार्चपर्यंत वनकोठडीत सुनावण्यात आली.
मटण पार्टीपूर्वीच उधळला डाव
रंगपंचमीच्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारात वन्यप्राणी साळिंदर (सायाळ) ची शिकार करून जेवणाचा बेत सुरू असतानाच वढोदा वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्या पथकाने धाड टाकून संशयित चौघांना अटक करीत रक्त लागलेली काठी, साळिंदरचे चार पंजे आणि मांस शिजवण्याचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणी निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकार, ऋषिकेश सुरेश अहिरकर, सुपडा रामचंद्र मेनकार (तिघे रा.चिंचखेडा खुर्द, ता.मुक्ताईनगर), शंकर साहेबराव सपकाळ (रा.बुलढाणा) यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना 10 मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली.

