भुसावळातील मोहसीन काझी यांचा भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्काराने गौरव
भुसावळ : शहरातील रहिवासी तथा पोलिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहसीन शरीफ काझी यांना रविवारी, 12 रोजी जळगाव येथील अल्पबचत भवनात झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमास जळगावचे आमदार राजूमामा भोळे, माजी महानगराध्यक्ष करीम सालार, मौलाना आझाद संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान. मोहसीन हे जिल्हा पोलिस दलातील एएसआय शरीफ काझी यांचे चिरंजीव होत.
