कजगावात पिस्टलाच्या धाकावर सराफा दुकानावर दरोड्याचा प्रयत्न फसला
An attempt to rob a bullion shop at gunpoint in Kajgaon failed भडगाव : तालुक्यातील कजगाव येथील बालाजी ज्वेलर्सवर पिस्टलाच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुदैवाने याचवेळी नागरीकांना ही बाब कळताच विरोध झाल्याने दरोडेखोरांना वाहनातून पसार होण्याची वेळ आली तर काही ऐवज चोरट्यांनी नेल्याची प्राथमिक माहिती आहे.
चोरीच्या वाहनातून आले आरोपी
कजगाव गावातील सराफ बाजारात उमेश बोरा यांचे बालाजी ज्वेलर्स नामक दुकन असून शनिवारी चार वाजता दोन संशयित कानातील बाळी घेण्याच्या निमित्ताने दुकानात शिरले व इतर दागिण्यांबाबत विचारणा करू लागल्यानंतर त्याचवेळी एकाने बोरा यांच्यावर पिस्टल रोखली व काही कळण्याआत काही वस्तू लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आरडा-ओरड झाल्यानंतर दरोडेखोरांनी नागरीकांच्या दिशेने पिस्टल रोखत वाहनातून पळ काढला. दरोडेखोरांनी दरोड्यासाठी आणलेले वाहन चोरी केलेले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सोयगाव तालुक्यातील निमखेडी धरणाजवळ हे वाहन सोडून आरोपी पसार झाले आहे.

पोलिस अधिकार्यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विलास पाटील, सचिन वाबडे, पो.ना नरेंद्र विसपुते, स्वप्निल चव्हाण, कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आदींची उपस्थिती होती.
