किनगाव-डांभूर्णी रस्त्यावर क्रुझरचा अपघात : चौघे वाजंत्री वादक जखमी
Cruiser accident on Kingaon-Dambhurni road : Four Vajantri players injured यावल : तालुक्यातील किनगाव येथून डांभुर्णीकडे जाणार्या रस्त्यावर भरधाव वेगात क्रुझर वाहन अनियंत्रित होऊन शनिवारी दुपारी अपघात घडल्याने चार जण जखमी झाले. जखमींना घटनास्थळावरून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
बँड पथकातील चौघे जखमी
चिंचोली, ता.यावल येथून बँड मधील वाद्य वाजवणार्या कामगारांना घेऊन किनगावकडून डांभूर्णीकडे क्रुझर (क्रमांक एम. एच.19 बी.जे. 7412) हे वाहन जात असताना किनगाव गावाच्या पुढे वळणावर वाहन अनियंत्रित झाले आणि ते रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. या अपघातामध्ये बँडमधील वाद्य वाजवण्याचे काम करणारे चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने घटनास्थळावरून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे कळू शकले नाही. मात्र या चौघांवर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

