भडगावात कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले : सहा गुरांची सुटका


भडगाव : कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन पकडण्यात आल्याची घटना शहरातील पॉवर हाऊस नजीक घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा गुरांची सुटका करण्यात आली.

सहा गुरांची सुटका
भडगाव पोलीस ठाण्याचे स्वप्नील चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भडगाव शहरातील पाचोरा रोडवर पॉवर ऑफिसजवळ पांढर्‍या रंगाची पिकअप (क्र. एम.एच.04 एफ.पी.1845) मध्ये सहा गुरांची वाहतूक करण्याचा परवाना नसताना अवैधरीत्या दाटीवाटीने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई करीत एक लाख 85 हजार रुपये किंमतीच्या सहा गोर्‍ह्यांसह अडीच लाखांची पिकअप जप्त करण्यात आली तर सहा गुरांना गो शाळेत रवाना करण्यात आले.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रईस खान सईद खान (रा.कुर्बान नगर, पाचोरा) आणि शेख सईद शे.बुढण (बाहेरपुरा, पाचोरा) या दोघांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सचिन वाबळे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !