गुप्तदानच्या नावाखाली महिलेची सोन्याची पोत घेत सावद्यातून चोरट्याचे पलायन


Under the guise of secret donation, a thief escapes from Savada by taking the gold texture of a woman सावदा : गुप्तदान करण्याच्या नावाखाली भामट्याने 62 वृद्ध महिलेची 62 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवल्याची धक्कादायक घटना शहरातील पवन नगरमधील महादेव मंदिराजवळ घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वास संपादन करीत काढला पळ
वैशाली नवलसिंग चौधरी (62, रा.पवन नगर, सावदा) यांना सोमवार, 13 रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास पवन नगर भागातील महादेव मंदीरासमोर रोडवर तोंडास मास्क लावलेला एक अनोळखी पुरूष भेटला. त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वयोगटातील होते. उंचीने मध्यम, शरीराने जाड मजबुत असलेल्या संशयीताने अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली होती. या भामट्याने वैशाली चौधरी यांना मला गुप्तदान करायचे आहे त्यामुळे तुमच्या गळयातील सोन्याची पोत माझ्याकडील पैशांना लावायची असल्याची थाप मारल वैशाली चौधरी यांना मंदीरासमोरील रस्त्यावर 20 पावले चालण्यास लावल्यानंतर भामटा दुचाकीवरून पसार झाला. या सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !