कानळद्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला : संशयित ताब्यात
Attempt to break ATM in Kanalda failed: Suspect in custody जळगाव : दगडाच्या मदतीने एसबीआयचे कानळदा गावातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
सोमवारी उघडकीस आली घटना
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील बसस्थानक येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम असून रविवार, 12 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एटीएम व्यवस्थित होते. दरम्यान, मध्यरात्री एकाने दगड मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

