आर्वे शिवारात वकीलाला खड्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न

शेताचा वाद उफाळाला : पाचोरा पोलिसात पाच संशयीतांविरोधात गुन्हा


Farm dispute escalated: Pachora police registered a case against five suspects पाचोरा : शेतातील वहिवाट रस्त्याच्या वादातून वकीलाच जिवंतपणी खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वकीलाच्या तक्रारीवरुन गुन्हा
मानसिंग प्रतापसिंग शीख (40, रा.गिरणा गॅस गोदामाजवळ, पाचोरा) हे शेतकरी असून वकीलीदेखील करतात शिवाय त्यांचे पाचोरा तालुक्यातील आवें शिवारात शेत आहे. शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्त्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू असतानाच रविवार, 12 मार्च रोजी दुपारी चार वाजता वहिवाटीच्या रस्त्यात जेसीबीने खोदकाम सुरू केल्याचे मानसिंग यांना दिसून आल्यानंतर त्यांनी चंद्रकांत श्रीराम शर्मा आणि अरुण चंद्रकांत शर्मा यांना विरोध केल्यानंतर त्यांनी मानसिंग यांना खड्डयात ढकलून दिले तसेच जेसीबीने त्यांच्या अंगावर माती टाकण्यास सुरुवात केली. हा प्रकार घडत असताना मानसिंग यांच्या भावाने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. नंतर मंगेश सुखदेव चंदनशिव, देविदास धनराज पाटील आणि जेसीबीचे चालक दीपक धनगर यांनी मानसिंग यांना मारहाण केली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !