वयोवृद्धाला मारहाण करीत चोपड्यातील पोलिस हवालदाराने दोन हजार हिसकावले


The police constable in Chopda grabbed 2000 by beating up the old man चोपडा : सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार्‍या पोलिस यंत्रणेतील पोलिस कर्मचार्‍यानेच वृद्धाला शिविगाळ करीत दमदाटी करीत मारहाण केली व त्यांच्या खिशातील दोन हजारांची रोकड लुटल्याची संतापजनक घटना चोपडा शहरात घडली. या प्रकरणी हवालदार संतोष पारधी विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिविगाळ, मारहाण करीत केली लूट
तक्रारदार दिनकर ओंकार ठाकरे (65, रा.पाटीलगढी) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवार, 16 फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेडकाई मोबाईल गॅलरी येथे लोकांची गर्दी दिसल्याने काय झाले म्हणून ते गेल्यानंतर गर्दीतील लोकांनी पंचनामा झाला, पोलीस लोक येऊन गेलेत. त्यावेळी दिनकर ठाकरे म्हणाले की, श्वान पथक चौकशीसाठी मागवायला हवे व चोरांचा कायमचा बंदोबस्त व्हायला हवा. हे वाक्य ऐकून पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी यांना राग आल्याने त्याने दिनकर ठाकरे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत दुचाकीवरून बसवून पोलीस ठाण्यात आणले व त्यांना चापटा-बुक्यांनी मारहाण केली. या घटनेत ठाकरे यांच्या कानास दुखापत झाली तसेच आपल्या खिशातील दोन हजार रुपये व मोबाईल फोन काढून घेण्यात आला व फोन परत करण्यात आला मात्र पैसे दिले नाहीत, असा आरोप ठाकरे यांनी केल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सकाळी पोलीस हवालदार पारधी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !