जळगावात साडेपाच लाखांच्या किराण्यावर कामगाराचा डल्ला


जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील किराणा दुकानात काम करणार्‍या तरुणानेच दुकानातील पाच लाख 69 हजार 530 रुपयांच्या किराणा मालावर डलला मारला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कामगाराने लांबवला किराणा
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील जावई गल्लीत नंदकिशोर भागवत शिंदे (43) यांचे रामेश्वर कॉलनीतच श्री समर्थ कृपा नावाने किराणा दुकान असून त्यावर विशाल शरद पाटील हा तरुण कामाला होता. 5 फेब्रुवारी 2023 ते 14 मार्च दरम्यान विशाल याने वेळोवेळी किराणा दुकानातून तब्बल पाच लाख 69 हजार 530 रुपयांचा किराणा चोरुन नेला व मंगळवार, 14 मार्च रोजी सायंकाळी प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक नंदकिशोर शिंदे यांनी दुसर्‍या दिवशी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विशाल शरद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !