बांभोरीत मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात टाकले लाकूड
धरणगाव : मद्यपी पतीने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याने त्याच्याविरोधात बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात मंगळवारी घडली.
धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
संशयित संदीप दगडू भदाणे (बांभोरी बुद्रुक) हा तरूण पत्नी रंजनाबाई आणि आई प्रमिलाबाई यांच्यासोबत वास्तव्याला असून मंगळवारी संदीप हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने पत्नी रंजनाबाई यांना शिवीगाळ केली तसेच घराच्या ओट्यावर आलेले लाकूड पत्नीच्या डोक्यात मारले. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्याने बुधवारी त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिल्याने संदीप दगडू भदाणे विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.