ब्लाऊज शिवण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने दिड लाखांचे दागिने लांबवले : सावदा शहरातील घटना


A woman who came on the pretext of sewing a blouse stole jewelery worth half a lakh: an incident in Savada city सावदा : ब्लाऊजला अस्तर लावण्याच्या निमित्ताने आलेल्या महिलेने चहा पिण्याच्या निमित्ताने घरातील एक लाख 53 हजारांचे दागिने लांबवल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला चहा बनवत असतानाचा चोरी केल्याचा आरोप
वैशाली मुकेश जैन (32, क्रांती चौक, सावदा) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता संशयित प्रांजळ शिरीष भंगाळे (देवकर वाडा, सावदा) या ब्लाऊजला अस्तर लावण्याच्या निमित्ताने घरी आल्या व त्यासाठी किती पैसे घेतात म्हणून विचारणा केली व नंतर आपल्याला चहा प्यायचा असल्याचे सांगितल्याने वैशाली या किचनमध्ये जाताच त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून एक लाख 11 हजार 300 रुपये किंमतीचे पोत तसेच 42 हजार रुपये किंमतीचे कानातले दागिणे घेवून पळ काढला. तपास हवालदार उमेश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !