पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून जळगावात तिघांना मारहाण


Three people were beaten up in Jalgaon out of anger for filing a complaint with the police जळगाव :  पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागातून महिलेसह तिच्या मुलगा, मुलगी यांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करण्यात आली. ही घटना अजिंठा चौफुलीजवळ कब्रस्तान येथे बुधवारी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार कल्पना रामचंद्र ब्राम्हणे (40, खेडी, ता.जळगाव) या बुधवार, 15 मार्च रोजी रात्री 11 वाजता कामाच्या निमित्ताने आल्यानंतर जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील कब्रस्तान येथून मुलगा आदित्य, मुलगी प्रेरणा व सोबत असलेला विजय रणदिवे यांच्यासोबत येत असताना मनीषा व युवराज देवरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याचा रागातून विनोद निकम, चेतन नंदू महाले, प्रतीकराज दिलीप चव्हाण आणि दिलीप यशवंत चव्हाण या चौघांनी शिवीगाळ करून दमदाटी केली नंतर चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तक्रारदार यांच्या बहिणीचा मुलगा अजय विजय रणदिवे याच्या डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर गुरुवार 16 मार्च रोजी दुपारी 2 वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेला तक्रारीवरून संशयित आरोपी विनोद निकम, चेतन नंदू महाले, प्रतीकराज दिलीप चव्हाण आणि दिलीप यशवंत चव्हाण (पूर्ण पत्ता माहित नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक सुनील सोनार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !