हॉटेलसाठी पाच लाख न आणल्याने विवाहितेचा छळ : भुसावळातील चौघांविरोधात गुन्हा
Harassment of married couple for not bringing 5 lakhs for hotel : Crime against four in Bhusawal यावल : तालुक्यातील म्हैसवाडी येथील माहेर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेचा हॉटेल उघडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने पतीसह चौघांनी छळ केला. पैसे आणले नाही तर नांदवणार नाही, तुझे अनैतिक संबंध आहे, तू मानसिक आजारी आहे, असा आरोप करून विवाहितेला छळण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौघांविरोधात गुन्हा
म्हैसवाडी माहेर असलेल्या राजेश्वरी उर्फ लक्ष्मी राहुल तायडे (23) या विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह 20 जानेवारी 2021 मध्ये राहुल डिगंबर तायडे-कोळी (अयोध्यानगर, भुसावळ) यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती राहुल डिगंबर तायडे-कोळी, सासू निर्मला डिगंबर तायडे-कोळी, जेठ मोहन डिगंबर तायडे-कोळीए नणंद शीतल दीपेश तायडे (सर्व रा.अयोध्या नगर, भुसावळ) या चौघांनी तिच्याकडे हॉटेल टाकण्याकरिता माहेरहून पाच लाख रुपये आण तू जर पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही, तुला फारकत देऊन टाकू असे सांगून शारीरिक आणि मानसिक छळ केला व शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश सानप करीत आहेत.