साकळीत वीज चोरी : एकाविरूध्द यावल पोलिस ठाण्यात गुन्हा
Chain electricity theft: A case against one in Yaval police station यावल : तालुक्यातील साकळी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकास वीज चोरी करतांना एक जण आढळल्यानंतर त्यास दंडाची नोटीस बजावूनही दंड न भरल्याने त्याच्याविरोधात वहज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साकळी गावात उडाली खळबळ
साकळी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांच्यासह पथकाने गावात वीज चोरी विरोधात धडक मोहिम राबवली. विद्युत वाहिनीच्या तारावर आकोडे टाकून वीज चोरी करतांना विष्णू पूनमचंद मोदी हा आढळल्याने त्याला दोन हजार 345 रुपये दंड भरण्या संदर्भात नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड अदा न केल्याने विष्णू लोधी याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.