सैन्यदलातील जवानाचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू : जळगावच्या कांचन नगरातील घटना

जळगावाील घटना : शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार


Army jawan dies due to dizziness : Incident in Kanchan Nagar, Jalgaon जळगाव : भारतीय सैन्य दलात सेवेत असलेल्या जळगावातील जवानाचा जीना उतरतांना चक्कर येऊन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील कांचन नगरात घडली. विशाल भरत सैंदाणे (35, रा. कांचन नगर, चौगुले प्लॉट, जळगाव) असे मयत झालेल्या जवानाचे नाव आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विशाल सैंदाणे हा भारतीय सैन्य दलात नोकरीस होता व अलीकडेच सुट्टीवर घरी कांचन नगरात आला होता. बुधवारी रात्री 9 वाजता घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला चक्कर आल्याने तो खाली कोसळला. अत्यवस्थ अवस्थेत तरुणांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. एकूलत्या एक मुलाचे अचानक अपघाती निधन झाल्याने आई-वडिलांवर व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला. गुरूवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहे. मयता जवानाच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहिण असा परीवार आहे.


कॉपी करू नका.