अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करू शेतकर्यांना मदत द्या
भुसावळात राष्ट्रवादी युवकची तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ : जिल्हयासह भुसावळ तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने केळीसह कापूस, हरभरा, मका, गहु उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. आधीच शेतमालाला रास्त हमीभाव नसल्यामुळे संकटात शेतकरी सापडले असताना दुहेरी संकट त्यांच्यावर ओढवले आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करून कोरडवाहु शेतकर्याला हेक्टरी 25 हजार तर बागायतदार शेतकर्याला 35 हजार रुपये हेक्टरी मदत सरसकट मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार दीपक धीवरे यांना करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख महेश सोनवणे, युवक शहराध्यक्ष रणजीत चावरीया, गटप्रमुख लक्ष्मण सपकाळे, शहर कार्याध्यक्ष विशाल ठोके, तालुका कार्याध्यक्ष अनिस खान लोधी, तुषार चौधरी, निलेश जाधव, सचिन पाटील, ओंकार तायडे, प्रशित जोहरे, निलेश कोलते, सलीम तडवी, राजू भोई व आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

