खडका येथून 51 हजारांचे कॉपर स्वीच लांबवले
51 thousand copper switch extended from Khadka भुसावळ : तालुक्यातील खडका येथील 132 केव्ही स्वीच यॉर्डातून चोरट्यांनी 51 हजार रुपये किंमतीचे 17 कॉपर स्वीच लांबवल्याची घटना रविवार, 12 रोजी सकाळी 9.30 वाजेला उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
पारेषण कंपनीचे कर्मचारी हर्षल चुडामण महाजन (43, साईचंद्रनगर, यावल रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, खडका शिवारातील 400 केव्ही खडका विभागातील 132 केव्ही स्वीच यार्डातून चोरट्यांनी प्रत्येकी पाच किलो वजनाचे 17 कॉपर रॉड अज्ञात चोरट्यांनी लांबवले. तपास सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे करीत आहेत.