विरोद्यात वीज चोरी करणार्या तिघांविरोधात गुन्हा
Crime against three who stole electricity in protest यावल : तालुक्यातील विरोदा येथे वीज वितरण कंपनीच्या फैजपूर कक्षाकडून वीज चोरी विरुद्ध मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गावातील तीन जणांना वीज चोरी करतांना पकडण्यात आल्यानंतर त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी दंड अदा न केल्याने यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात अखेर पोलिसात गुन्हा
फैजपूर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे कक्षातील कनिष्ठ अभियंता मयूर भंगाळे यांनी विरोदा येथे वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. कक्षाचे अभियंता मयूर भंगाळे सह देवेंद्र सुरवाडे, जगन्नाथ कोळी, अशोक बर्हाटे, राहुल होले या पथकाने गावात तपासणी केली असता संजय पुंजू पाटील, वसंत किसन खाचने व उषाबाई दत्तात्रय वारके हे तिघे वीज चोरी करतांना आढळले. या तिघांना तडजोडी अंती प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला मात्र त्यांनी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अभियंता मयूर भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.