खोके-खोके म्हणून किती पाप झाकणार ! : सत्तेसाठी तुम्ही शिवसेना गहाण ठेवली :  मुख्यमंत्र्यांनी चालवले टिकेचे बाण


How many sins will be covered as boxes : You mortgaged Shiv Sena for power: Chief Minister fired tick arrows खेड : आपल्यालाला शिवसेना पुढे न्यायची आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. शिवसेनेला पूर्वी डाग लावण्याचा प्रयत्न केला, तो पुन्हा लावू द्यायचा नाही. गद्दारी आम्ही नाही केली, गद्दारी 2019 मध्ये झाली होती. बाळासाहेंबांचे विचार तुम्ही चुकीचे ठरवले. कशासाठी? सत्तेसाठी…हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, मुंबईत हजारो लोक मारले, त्यांना साथ देणार्‍यांच्या मांडीला-मांडी लावून तुम्ही बसला. याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण तुम्ही कसे करू शकता. हीच हिंदुत्वाशी बैमानी आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, यावर तुम्ही काहीच बोलत नाही. तोंड दावून बुक्क्यांचा मार सहन करायची वेळ येते. मनिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी चपलेने झोडपले होते. पण, तुम्ही राहुल गांधींना काही बोलत नाही. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर त्या मैदानावर रविवारी मुख्यमंत्र्यांनी सभा घेत ठाकरेंवर टिकेचे बाण चालवले.

टिकेला उत्तर द्यायला आलेलो नाही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ते लोक आज आपली सभा पाहत असतील. पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. काही दिवसांपूर्वीच याच गोळीबार मैदानात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. परंतू, तोच-तोच थयथयाट…तिच तिच आदळ आपट, याला काय उत्तर देणार.

बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम केलं
मुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून हाच थयथयाट आदळआपट सुरू आहे. तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली होती. त्यांचे महाराष्ट्रात सर्कसीप्रमाणे शो होणार आहेत. तेच आरोप, तेच रडगाणे फक्त जागा बदल. त्यांच्याकडे फक्त दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याबद्दल काय बोलणार. काही लोकांना वाटत असेल, यांच्या सभेला एव्हढी गर्दी कशी झाली. कोकणी माणसाने बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर प्रेम केलंय. हेच प्रेम या सभेने दाखवून दिलंय. आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, याच सभेने त्यांना उत्तर दिलंय.

सत्तेसाठी शिवसेना गहाण ठेवली
सत्तेसाठी यांनी काय केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवली. ज्या लोकांसोबत आम्ही निवडणूक लढवली, लोकांनी ज्या विचाराला मतदान केलं त्यांच्यासोबत गेलो. प्रत्येक पत्रकावर बाळासाहेब आणि नरेंद्र मोदींचा फोटो होता. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी या विचाराशी गद्दारी केली. याविरोधात आम्ही भूमिका घेतली आणि गद्दारीचा डाग पुसण्याचे काम केले आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला.

आणखी किती पाप झाकणार
तुम्ही खोके-खोके गद्दार-गद्दार म्हणून किती पाप झाकणार. बाळासाहेब तुमचे वडील होते, हे आम्हाला, जगाला मान्य आहे. पण, ते आमचे दैवत होते. तुम्ही त्यांना वडील-वडील करुन छोटे करू नका. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. 70 वर्षे या देशाची लूट करणार्‍या टोळीसोबत तुम्ही आहात की, काश्मीरमध्ये कलम 370 हटवणार्‍या देशभक्तासोबत आहात? भारताचे तुकडे करणार्‍या तुकडे-तुकडे गँगसोबत तुम्ही आहात की, त्या लोकांना त्यांची जागा दाखवणार्‍या लोकांसोबत तुम्ही आहात? देशावर घराणेशाही लादणार्‍या लोकांसोबत तुम्ही सोबत आहात की, दिवस-रात्र देशासाठी काम करणार्‍या नरेंद्र मोदींसोबत आहात? परदेशात देशाची बदनामी करणार्‍या राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार्‍या लोकांसोबत तुम्ही आहात? असे सवाल यावेळी शिदेंनी विचारला.


कॉपी करू नका.