गेंदालाल मिल भागात विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
32-year-old married woman molested in Jalgaon जळगाव : शहरातील गेंदालाल मिल भागात 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करीत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी संशयित कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडली.
रस्ता अडवत केला विनयभंग
गेंदालाल मिल भागातील 32 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, शनिवार, 18 मार्च सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आरोपी कादर खान फकिरा खान याने रस्ता अडवत अश्लील वर्तन करीत विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर विवाहितेने जळगाव शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत.