ऑनलाईन कुरीयर स्टेटस तपासताना चोपड्यातील प्रौढाची एक लाखात फसवणूक
An adult in Chopda was cheated of one lakh while checking online courier status चोपडा : ऑनलाईन पद्धत्तीने मागवलेल्या कुरीयरचा स्टेटस तपासताना मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयीताने ऑनलाईन पद्धत्तीने दोन रुपये स्वीकारत नंतर एक लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार शहरात घडला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन रुपये स्वीकारून एक लाख वळवले
तक्रारदार खंडेराव माधवराव पाटील (46, रामकुवर नगर, चोपडा) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, 10 रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांची मुलगी प्रांजली ही तिरुपती कुरीयर, चोपडा यांच्याकडून प्राप्त होणारे कुरीयर डिस्पॅच होण्यासाठी ट्रॅकींग करीत असताना 8698867363 या क्रमांकावरील अज्ञाताने संपर्क साधत दोन रुपये पाठवलेल्या लिंकवर पाठवण्यास सांगितले व तसे केल्यानंतर दुसर्या दिवशी बँक खात्यातून 98 हजार 698 रुपये परस्पर वळते झाले. या प्रकारानंतर पाटील यांनी चोपडा शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील करीत आहेत.