अंगावर वीज पडल्याने नगाव खुर्दच्या तरुणीचा मृत्यू


Nagaon Khurd girl dies due to lightning strike अमळनेर : अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असतानाच वीज कोसळल्याने नगाव खुर्द गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. निरगली मुका बारेला (17, नगाव खुर्द, मूळ रा.टाक्यापाणी, ता.वरला, मध्यप्रदेश) असे मयत तरुणीचे नाव आहे.

कामावरून परतताना कोसळली वीज
निरगली बारेला ही युवती नगाव खुर्द शिवारात शेतीक कामांसाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात घरी येत असताना अचानक वारा-वादळासह अवकाळी पावसाला सुरूवात झाल्यानंतर वीज कोसळल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अमळनेरसह परीसराह गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाचे वातावरण असून रविवारी सायंकाळी नगाव खुर्द शिवारातुन मजूर महिला घराकडे निघाल्या असताना निरगलीदेखील येत होती मात्र ती मागे राहिल्यानंतर ही दुर्घटना घडली. निरगली बारेला हिच्या मृत्यू प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !