जाती-पातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र विकासात मागे : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील


Maharashtra lags behind in development due to caste-caste politics : C.R.Patil सावदा : आपण गुजरातचे नसलो तरी गुजरातमध्ये आपल्याला भरभरून मतदान मिळत असते. कारण आपण कोणतेही जातीचे राजकारण करत नाही याचा विश्वास त्या ठिकाणच्या जनतेला असल्याने ते माझ्या पाठिशी उभे राहतात. पण सध्या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु असल्यामुळे राज्याची प्रगती खुंटत आहे. कधी काळी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र सगळ्यात पुढे असलेले राज्य आता मागे पडू लागले आहे. महाराष्ट्र राज्य पुढे न्यायचे असेल जाती पातीच्या विचाराला नव्हे तर गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर या जातीपातीच्या विचारांचा फटका आपल्या पुढच्या पिढ्यांना बसणार असल्याचा इशारा गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी येथे देत भाजपाला घरचा आहेर दिला. सावदा येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त ते आल्यानंतर बोलत होते.

नेहरूंनी देशासाठी कोणतेही काम केले नाही
सी.आर.पाटील म्हणाले की, देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. श्रीमंत घरातील असल्याने त्यांचे राहणीमान पाहता त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक भावना होती. मात्र पंतप्रधान असताना त्यांनी देशासाठी कोणते काम केले त्याची इतिहासात कुठेही नोंद आढळून येत नाही. कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांनी 1971 साली पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकले आणि त्या नावारूपाला आल्या. पंतप्रधान असताना त्यांनी देशातील गरीबी हटावचा नारा दिला मात्र गरिबी काही कमी झाली नाही, अशी सडकून टीका त्यांनी करीत मोंदीबाबत मात्र स्तुतीसुमने उधळली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.


कॉपी करू नका.