जळगावातील शिवाजी नगरातून भरदिवसा 70 हजाराची रोकड लंपास


70 000 cash stolen from Shivaji Nagar in Jalgaon जळगाव : घराचे दरवाजे उघडे असल्याची आयतीच संधी चोरट्यांनी साधत कपाटातून भरदिवसा 70 हजारांची रोकड लांबवली. शहरातील शिवाजी नगरातील मिर्झा चौकात ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर उघडे असल्याची साधली संधी
इलेक्ट्रीक फिटींगचे काम करून उदरनिर्वाह करणारा शेख अकिल शेख सलीम (28) हा कुटुंबासह शिवाजी नगरात वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेख अकिकल हे कामावरून घरी आल्यानंतर घराचे दरवाजे उघडेच राहिल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातून 70 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार दुपारी दिड ते साडेतीन वाजेदरम्यान घडला. जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भास्कर यशवंत ठाकरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !