रस्त्यात बसू नका म्हटल्याच्या रागातून भुसावळातील वाहन चालकास बेदम मारहाण


A motorist in Bhusawal was brutally beaten up for not sitting on the road भुसावळ : रस्त्यावर दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांना हटकल्यानंतर एकाने वाहन चालकास मारहाण केल्याची घटना चितोडे मंगल कार्यालयाजवळील मैदानावर सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
शहर पोलिसात परेश हरीदास सोनवणे (24, श्रीनगर, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते वाहन चालक असून सोमवारी रात्री ते माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्याकडे पाण्याचे जार भरण्यासाठी जात असताना संशयित मयूर अंभोरे (हुडको कॉलनी, भुसावळ) व दोघे रस्त्यात दारू पिण्यासाठी बसलेले असताना सोनवणे यांनी रस्त्यात बसू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने अंभोरे यांनी हातातील कड्याच्या सहाय्याने मारहाण केली तसेच शिविगाळ केली. तपास नाईक संदेश निकम करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !