भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडीच्या प्रौढाचा मृत्यू


An adult from Ramdevwadi died in a collision with a speeding car जळगाव : भरधाव कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रामदेववावडी येथील दुचाकीस्वार रमेश मदन राठोड (45, रा.रामदेववाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील टेकडीजवळ घडली. अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कार चालकाच्या धडकेने मृत्यू
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील रमेश राठोड हे शेतकरी मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे येत असताना पाचोरा शहराकडून भरधाव कार (एम.एच.19 डी.व्ही. 7513) ने दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागून जोरदार धडक दिल्याने रमेश राठोड हे गंभीररीत्या जखमी होवून बेशुद्ध झाले. त्यांना लागलीच ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवित असतांना रस्त्यातच त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली असा परीवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप पाटील व स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकासह कार ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !