मनी लाँड्रींग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत धरणगाव तालुक्यातील नोकरदार तरुणीकडून उकळले 70 हजार


Dharangaon girl cheated by claiming to be speaking from Mumbai Crime Branch धरणगाव : क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत मनी लाँड्रींगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत धरणगाव तालुक्यातील साळवे येथील 24 वर्षीय तरुणीची 70 हजारात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत फसवणूक
धरणगाव तालुक्यातील 24 वर्षीय तरुणीला 18 मार्च रोजी दुपारी 12.10 वाजता एका क्रमांकावरून आलेल्या कॉलधारकाने मुंबई येथून कुरीअर सेंडरमधून बोलत असल्याचे सांगत कुरीयर आल्याचे सांगितले मात्र तरुणीने कुरीयर मागवले नसल्याचे सांगितल्यांतर संबंधीताने त्यावर अंधेरीचा पत्ता असून तुमच्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याने तुम्हाला सायबर क्राईम ब्रँच सोबत संपर्क करुन देतो, त्यांचे मार्गदर्शन घ्या, असे म्हणत फोन कट केला व काही वेळेनंतर दुसर्‍याच मोबाईल क्रमांकावरुन तरुणीला फोन आला.

मी मुंबई क्राईम ब्रँचमधून पोलिस बोलत असून तुमच्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याचे आम्हाला दिसत असल्याची बतावणी त्याने केली. फोन सुरू असतांनाच बोलणार्‍या तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर एक लिंक पाठवत, तुमचे आधार कार्ड पाठवा असे म्हणत तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस झाल्याने मोठ्या साहेबांना सांगावे लागेल परंतु आम्हाला सहकार्य करावे लागेल, अशी बतावणी केली. कायद्याची भीती दाखवत 98 हजार 326 रुपयांची मागणी केली व व्हॉटसअ‍ॅपरवर अज्ञात आरोपींसह पोलिसांचे फोटो पाठवले तसेच तरुणीने गुन्हा केला असल्याचे पत्र पाठवल्याने तरुणीने भीतीपोटी 98 हजार 326 रुपये पाठवले व नंतर त्या क्रमांकावर कॉल केला असता संपर्क न झाल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !