जामनेरला न्यायालयाच्या आवारात तरुणीचा विनयभंग
Young girl molested in Jamner court premises जामनेर : कौटुंबिक वादानिमित्त जामनेर न्यायालयात आलेल्या एका गावातील 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता वाजता घडली. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून जामनेर पोलिसात संशयित जितेंद्र कैलास कुमावत (नेरीदिगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठार मारण्याची धमकी देत विनयभंग
23 वर्षीय तरुणी मंगळवारी जामनेर न्यायालयात कामानिमित्त आल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर संशयित जितेंद्र कैलास कुमावत याने तरुणीला जवळ ओढत तिच्याशी अश्लील वर्तन करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयिताच्या त्याच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू असून त्यातून ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस नाईक राजू तडवी करीत आहे.


