जळगावात रीक्षा चालकाची आत्महत्या
Rickshaw driver suicide in Jalgaon जळगाव : रीक्षा चालक प्रौढ व्यावसायीकाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या कांचन नगरात उघडकीस आली. दत्तू नामदेव चौधरी (48) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कांचन नगरातील रीक्षा व्यावसायीक दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी पत्नी मुलीला घेवून केटरींग कामाला निघून गेल्यानंतर चौधरी मुलासह घरी असतानाच मुलगा बाहेर गेल्यानंतर त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेतला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगा घरी परतल्यावर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्याने आक्रोश केला. आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
