बँकेतून बोलत असल्याचे तरुणाला भासवले : ओटीपी विचारून क्रेडीट कार्डाद्वारे 60 हजारांची परस्पर केली शॉपींग
60,000 online fraud to a youth of Nim in the name of the bank अमळनेर : बँकेतून बोलत असल्याचे सांगून तरुणाचा विश्वास संपादन करीत ओटीपी क्रमांक घेवून तरुणाच्या बँक खात्यातून 60 ऑनलाईन शॉपींग करून फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील निम गावात डिसेंबर 2022 मध्ये घडली होती. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून मारवड पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणुकीच्या वाढल्या घटना
अमळनेर तालुक्यातील नीम येथील सुनील शिवाजी पाटील (31) या तरुणाला 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजता अनोखळी नंबरवरून कॉल आला व संबंधिताने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत तरुणाच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक विचारून तरुणाच्या क्रेडीट कार्डाद्वारे 59 हजार 449 रुपयांची ऑनलाईन शॉपींग करीत फसवणूक केली. हा प्रकार उशिरा तरुणाच्या लक्षात आल्याने मारवड पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.
