वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राला लाभलेले वैभव
भुसावळ : वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रासह खान्देशाला लाभलेले वैभव असून आपण संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासोबतच या गौरवशाली परंपरा कायम ठेवायला हवी. सदगुरु झेंडूची महाराजाच्या दिंडीची परंपरा अखंड सुुरु ठेवावी. तसेच समाजातील दानशुरांचा आदर्श घेत धार्मिक कार्यक्रमांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी येथे केले. शहरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थानतर्फे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व सद्गुुरु धनजी महाराज भुसावळकर यांच्या स्मृती मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील लाईफ केअर हॉस्पीटल शेजारी 17 एकर जागेवर सद्गुरू झेंडुजी महाराज बेळीकर दिंडी परंपरेचे द्वितीय वारसदार गुरुवर्य ह.भ.प. भरत महाराज यांच्याहस्ते स्मृती मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
मंगल कार्यालयाचेे भूमिपूजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याहस्ते, विठ्ठल रखुमाई मंदिराचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे, महादेव मंदिराचे भूमिपूजन शास्त्री धर्मस्वरूप दासजी यांच्याहस्ते तर हनुमान मंदिराचे भूमिपूजन हभप वासुदेव महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, हभप भरत महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सावकारे यांनी या मंदिर उभारणीसाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. सकाळी मान्यवरांच्या हस्ते टाळमृदंग व भजनी मंडळाकडून रामकृष्ण हरीच्या गजरात कार्यक्रम पार पडला. आभार हभप दीपक महाराज यांनी केले.

खडसे देणार विठ्ठल रखुमाईची मूर्ती
भगवान श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी मंत्री एकनाथ खडसे हे श्री. विठ्ठल व रखुमाईची मूर्ती भेट देणार असल्याची माहिती यावेळी हभप भरत महाराज यांनी दिली. पंढरपूर येथे असलेल्या भगवान विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीची हूबेहूब प्रतिकृती असलेल्या या मूर्ती असतील, असेही त्यांनी सांगितले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी महापौर जयश्री महाजन, मंदा खडसे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, विष्णू भंगाळे, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी आमदार दिलीप भोळे, रमण भोळे, उमेश नेमाडे, प्रा.सुनील नेवे, नीळकंठ भारंबे, माधुरी फालक, सुधीर पाटील, महेश फालक, विकास पाचपांडे, प्रा.प्रशांत पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष सुहास फालक यांच्यासह नारायण महाजन, प्रशांत बर्हाटे, गणेश बन्हाटे, वामन झोपे, जनार्दन फालक, प्रल्हाद फालक, निवत्ती अत्तरदे, मनोज महाजन, सुनील नेमाडे व प्रदिप फालक यांच्यासह समाजबांधवांनी परीश्रम घेतले.
