भादली बु.॥ येथे शेतकर्‍यावर हल्ला : एकाविरोधात गुन्हा


Bhadli B. Assault on farmer here : Crime against one जळगाव : शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून शेतकर्‍याला विळा मारून दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तालुक्यातील भादली बुद्रुक येथे घडलेल्या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

झाडांच्या वादातून हल्ला
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे दीपक लक्ष्मण कोल्हे हे वास्तव्यास असून त्यांची भादली बुद्रुक शिवारातील गट नंबर 15 17 या ठिकाणी शेती आहे. गुरुवार, 23 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातीलच मोहन पुंडलिक चौधरी हे कोल्हे यांच्या शेताच्या सामूहिक बांधावरील बाभळीचे झाड विळ्याने तोडत असताना दीपक कोल्हे यांनी चौधरी यांना उद्देशून तुम्ही मला न विचारता झाड का तोडत आहात? असे विचारले असता त्याचा राग आल्याने मोहन चौधरी यांनी दीपक कोल्हे यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. चौधरी यांनी कोल्हे यांच्या डाव्या हातावर विळा मारून दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दीपक कोल्हे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मोहन पुंडलिक चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !