जळगावात भरधाव डंपर कारवर आदळला : शिक्षिकेसह तिघे जखमी
Rushing dumper collides with car in Jalgaon : Three injured including teacher जळगाव : भरधाव डंपरने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. शास्त्री टॉवर चौकात शुक्रवारी हा अपघात घडला.
अपघातानंतर डंपर चालक पसार
जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.7917) ही नेहरू पुतळ्याकडून टॉवर चौकात येत असतांना त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एम.एच.19 झेड.4100) ने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील शिक्षिका सविता अशोक सानेवणे (40, रामानंद नगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. तिघांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघातानंतर डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
